Skip to content Skip to footer

कट्टर राणे समर्थकांचा शिवसेना पक्षात प्रवेश!

कट्टर राणे समर्थकांचा शिवसेना पक्षात प्रवेश!

शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील वाद जगजाहीर आहे.
नाईकांच्या मतदारसंघातील कुडाळच्या सभापतींना भाजपात आणून राणेंनी सुरुंग लावल्याचा प्रकार ताजा असतानाच अवघ्या तीन दिवसांत वैभव नाईक यांनी त्याचा बदल घेतला आहे. कट्टर राणे समर्थक असलेल्या कुडाळ पंचायत समिती सदस्य नीलिमा वालावलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

वालावलकर या कुडाळ पंचायत समितीच्या पिंगुळी मतदारसंघातील विद्यमान सदस्य आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन आमदार नितेश राणेंना वैभव नाईक यांनी धक्का दिला आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये हा पक्षप्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे नारायण राणेंना हा मोठा धक्का बसला आहे.

Leave a comment

0.0/5