Skip to content Skip to footer

अखेर मुंडे प्रकरणात तक्रारदार महिलेची माघार, ट्विटकरून दिली माहिती

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात एकचं खळबळ उडाली होती. त्यातच पीडितेच्या आरोपांना कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या होत्या. भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली होती. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. यानंतर तक्रारदार महिलेने मुंडे विरोधातील तक्रार आपण माघार घेत असल्याचे ट्विट केले आहे.

“एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते, असे रेणू शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5