Skip to content Skip to footer

कृषी कायद्याचा पंजाब निवडणुकीत भाजपला फटका, २९ जागांवर दणदणीत पराभव

केंद्रानं पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र या आंदोलनाचा आता हरियाणा आणि पंजाब येथे होत असलेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपला फटका बसताना दिसत आहे.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी ८ नगरपालिका, १०९ नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपला दणदणीत पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्व २९ जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. या सर्व जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे

शेतकरी आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशनातही त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे.

Leave a comment

0.0/5