Skip to content Skip to footer

खासदार मोहन डेलकर आत्महत्या, इंधन दरवाढीवर विरोधकांचे मौन का? – उद्धव ठाकरे

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र याच मुद्द्यावरून विरोधकांनी सुरु केलेल्या गलिच्छ राजकारणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. ते काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते

ते म्हणाले की, पूजा चव्हाण मृत्यूबाबत गलिच्छ राजकारण करणारे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवर मौन बाळगतात आणि वाढीव वीज देयकांविरोधात आंदोलन करणारे पेट्रोल-डिझेलच्या महागाईबाबत मात्र गप्प बसतात. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

तसेच विरोधकांना टोला लागवताना ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे निराधार आरोप करत सुटले असून त्यांची कीव करावीशी वाटते. जगाने करोना नियंत्रणासाठी धारावी पॅटर्नचे कौतुक केले, पण विरोधक त्या करोनायोद्धय़ांचा अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आणि पुण्यतिथी यातील फरकही यांना समजत नाही आणि ते आम्हाला सावरकर शिकवतात, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला होता .

पुढे पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कारवाईही होईल, अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिच्या परिवाराला दिली होती.

Leave a comment

0.0/5