Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पत्रकार मधू कांबळे यांच्या ‘समतेशी करार’ या पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र बुलेटिन : पत्रकार मधू कांबळे यांच्या ‘समतेशी करार’ या पुस्तकाचे प्रकाशन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत, परंतु आपण स्वातंत्र्याचे किरण तळागाळापर्यंत पोहोचवण्यास सक्षम झालो आहोत का? याचा विचार करणे गरजेचे आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी जे समतेचे विचार मांडले ते आजही आपल्या सोबतच आहेत, परंतु त्या सामाजिक समतेचे जे देणं त्यांनी आपल्याला दिले आहे ते आपण कुठेतरी विसरत चाललोय. या विचारधारेला पुढे नेण्यासाठी जातपातविरहित आणि माणूस म्हणून सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार मधू कांबळे यांनी ‘समतेशी करार’ या पुस्तकातून मांडला आहे, असे उद्धव ठाकरेंनी या पुस्तक प्रकाशनादरम्यान सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानतेसाठी आयुष्यभर कृतिशील लढा दिला. आपण मूलतः माणूस असतो. नंतर आपल्याला धर्म, जातपात या गोष्टी चिकटतात. समाजात वावरताना त्या गोष्टी आपण मिरवत असतो. त्या गोष्टी बरोबर आहेत की चुकीच्या याबाबतीचा संभ्रम जेव्हा आपल्या मनात निर्माण होतो, त्यावेळी ज्या गोष्टी आपल्याला मार्ग दाखवतात त्यात हे पुस्तक वाटाड्याची भूमिका निभावेल अशा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी राजकुमार सागर, गौतमीपुत्र कांबळे, सुहासिनी कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5