ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात हक्काच्या पाण्यासाठी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर धडक जल आक्रोश मोर्चा

ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात हक्काच्या पाण्यासाठी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर धडक जल आक्रोश मोर्चा

महाराष्ट्र बुलेटिन :हक्काच्या पाण्यासाठी धनकवडी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात धडक जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा भाग तीन वर्षांपासून महापालिकेत समाविष्ट झाला असूनही नागरिकांना अद्याप हक्काचे पाणी मिळत नाही. पाण्याअभावी महिला भगिनींच्या डोळ्यातून पाणी निघत आहे.

मोर्चा काढण्याची वेळ ही पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आली असून भरपूर वेळा यासंदर्भात निवेदने देऊनही दखल घेण्यात आलेली नाही. पालिका प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर उत्तर द्यावे की परिसराला कधी पाणीपुरवठा केला जाईल. हा फक्त ट्रेलर आहे, पाणी लवकर मिळालं नाही तर पिक्चर दाखवेन. असे चेतन मांगडे यांनी या मोर्चा दरम्यान पालिका प्रशासनाला फटकाऊन सांगितले आहे.

यावेळी आक्रोश मोर्चा जरी असला तरी निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे. लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढच्या वेळी आमच्या संयमाचा बांध फुटेल आणि नंतर जे काही होईल त्याला अधिकारी लोकप्रतिनिधी सगळेच जबाबदार असतील. कित्येक दिवसाचा हा संघर्ष असून आता यास पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे आणि तो मी देऊन राहणार असेही चेतन मांगडे यांनी पालिका प्रशासनाला सुनावले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here