Skip to content Skip to footer

बावधनसाठी नवीन वीज केंद्र मंजूर करा; खासदार सुळेंकडे खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल वेडेपाटील यांची मागणी.

बावधन खुर्द व बुद्रुक येथील लोकसंख्या वाढत आहेत. पण बावधनला डहाणूकर कॉलनी उपकेंद्रातून व सुसरोड भागामधील वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा होत आहे. डहाणूकर सबस्टेशन येणारी उच्चदाब लाईन ही पूर्णतः डोंगराळ भागामधून व एनडीए मधून येत असल्यामुळे लाईन बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी विलंब होत आहे. पुणे शहरामध्ये वीजवितरण प्रणालीमध्ये पूर्ण रिंग पद्धत आहे. परंतु आपल्या भागामध्ये वीज उपकेंद्र नसलेमुळे आपणास त्या प्रणालीचा फायदा घेता येत नाही. कारण सुसरोड सबस्टेशनवर लोड शिल्लक नाही असे कर्मचाऱ्यांकडून समजते. त्यामुळे बावधन भागांमध्ये नव्याने नवीन केंद्र सुरू करण्याची गरज असल्याची मागणी खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल वेडेपाटील यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केली आहे.

बावधन भागामध्ये २५ जुलै २०१९ ला खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून व महावितरण कंपनीकडून आधुनिक उपकरणे उदा. आरएमव्ही (RMV) बसवून विद्युत प्रणाली अद्यावत करण्यात आली आहे. परंतु सबस्टेशन अभावी त्या प्रणालीचा उपयोग होत नाही. आज बावधन भाग पूर्णतः डहाणूकर सबस्टेशनवर अवलंबून आहे.

कुणाल विलास वेडेपाटील यांनी पीएमसीच्या माध्यमातून कोकाटे वस्तीतील रस्त्याचे काम केले पूर्ण…

सद्यस्थितीतील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी संपवण्यासाठी व भविष्यात येणाऱ्या व सद्यस्थितीत असणाऱ्या रहिवासी सोसायट्यांना अखंडित वीजपुरवठा देणेसाठी या भागाला अतिउच्च दाब विजकेंद्र होणे आवश्यक आहे व त्यासाठी योग्य जागा ही बावधन बुद्रुक येथे उपलब्ध आहे. स्मार्ट पुण्यामधील लोकांना स्मार्ट व अखंडित वीजपुरवठा देणेसाठी बावधन भागामधील लोकांची विनंती मान्य करून या भागाला न्याय द्यावा व वीजकेंद्र मंजूर करण्याची विनंती ही यावेळी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विजेची समस्या गंभीर असून यामध्ये हे प्रश्न असतात यावर काही उपाय करण्याची गरज असून बावधन भागांतील महावितरण अधिकारी आणि नागरिक याची संयुक्त बैठक घेऊन ही समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन तर सुप्रिया सुळे यांनी दिले.

Leave a comment

0.0/5