Skip to content Skip to footer

रिंगरोड वरून PCMC मध्ये गोंधळ!

पिंपरी – शहरातून जाणाऱ्या रिंगरोडच्या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि. २० जुलै) गदारोळ उडाला.
सभा चालू झाल्यावर विरोधीपक्ष नेते योगेश बहाल यांनी रिंग रोड वर चर्चा घ्यावी अशी मागणी केली. काळजे यांनी सर्व विषय संपल्यावर बोलण्याची संधी दिली जाईल असे सांगितले सभेसमोरील विषयांबाबत निर्णय झाल्यानंतर सभा समारोपाच्या प्रसंगी रिंगरोडच्या प्रश्‍नावर चर्चा घ्यावी, अशी मागणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उचलून धरली. त्यानंतर, मंगला कदम यांना बोलण्यास संधी देण्यात आली. त्या म्हणाल्या, ‘‘महापौर, तुम्ही दबावाखाली काम करीत आहात. तुम्ही भित्रे आहात.’’ त्यावर, ‘‘माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मला कोणीही शिकवू नये. विषय सोडून बोलू नका. मी भित्रा नाही,’’ असे प्रत्युत्तर काळजे यांनी दिले. ह्या वरून सत्ताधरी व विरोधक यांच्यात बाचाबाची झाली.

Leave a comment

0.0/5