Skip to content Skip to footer

‘संजू’ आता कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर 

मुंबई– बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.

संजूने सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे. 32 व्या दिवशी या चित्रपटाने 339.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याबाबतीत, टायगर जिंदा है या चित्रपटाने 32 व्या दिवशी 339.17 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता संजूच्या पुढे केवळ बाहूबली-2 (510.99 कोटी), दंगल (387.38 कोटी), पीके(340.8 कोटी) हे चित्रपट आहेत. त्यातील पीके या चित्रपटाला याच आठवड्यात संजू पाठीमागे टाकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा ‘संजू’ चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि मनिषा कोईराला यांच्या भुमिका आहेत.

via अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5