Skip to content Skip to footer

बाणेर-बालेवाडी पाणीप्रश्न व नवीन बांधकाम स्थगिती बाबत आज निकाल

बाणेर : अमोल बालवडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च नायालयाने पाणीप्रश्नावर ठोस आराखडा सादर करा व तो पर्यंत या भागातील नवीन बांधकामांना ओ.सी. व सी.सी. देऊ नका अशी सुनावणी दिली होती. आज (शुक्रवार दि २८) रोजी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

पुणे महानगर पालिकेने सादर आराखडा तयार केला आहे व आज तो ते उच्च न्यायालयात सादर करतील हा आराखडा मंजूर झाल्यास बाणेर बालेवाडीतील स्थगिती उठवली जाऊ शकते, म्हणून ह्या सुनावणीकडे महापालिका व शहरातील बिल्डरांचे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याने पालिका प्रशासन आता काहीतरी ठोस उपाययोजना करून पाणीप्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा बाणेर बालेवाडीतील त्रस्त नागरिकांना आहे, पण ठोस उपाययोजना करण्यापेक्षा केस मागे घ्या अशी विनंती अमोल बालवडकर यांना पालिका वारंवार करत आहे व प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत अशी चर्चा सध्या बाणेर-बालेवाडीत आहे.

“गेल्या १० वर्षात बाणेर बालेवाडी भागातील वस्ती झपाट्याने वाढली आहे व गेल्या दीड वर्षात जवळजवळ ३०० सोसायट्यांनी करोडो रुपये पाण्याच्या टँकर वर खर्च केले आहेत. नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. एकही पाणी योजना प्रभागात राबवली नाही.
नवीन पाणी जोडणी घेण्यासाठी लोकांना पालिकेत चकरा माराव्या लागत असताना बेकायदा नळ जोडण्या वाढत आहे. आज प्रभागातील क्षेत्रीय कार्यालय, जलतरण तलाव, सांस्कृतिक भवन, ई-लर्निंग स्कूल, भाजी मंडई, उद्याने, विरंगुळा केंद्र, ही सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. ही याचिका मी नागरिकांनासाठी दाखल केली आहे. याचिका मागे घेण्यास मला अनेकांनी सांगितले. मात्र, प्रभागातील सर्व सामान्य जनतेच्या हिताशी मी कटिबद्ध आहे.” असे अमोल बालवडकर म्हणाले.

Leave a comment

0.0/5