पुणे – चांदीच्या पालखीसोबतच महोत्कट रथ, जगदंब रथ, धूम्रवर्ण रथ, गरुड रथ, भुवनेश्वर येथील प्राचीन गणेश मंदिर आणि विद्युत रोषणाईंवर आधारित काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृती, विविध प्रकारच्या वाद्यांच्या सजावटीतला फुलांचा रथ तसेच रथावर समाजप्रबोधनपर देखावे विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत.
रविवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन रथांची तयारी करण्यात कार्यकर्ते व्यग्र होते.
पुण्यनगरीच्या वैभवशाली मिरवणुकीत ‘श्रीं’चा विसर्जन रथ उल्लेखनीय ठरावा, यासाठीच मंडळांतर्फे आकर्षक रचनेतले रथ तयार करण्यात येत आहेत.
अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने प्राचीन मंदिराची प्रतिकृती रथावर उभी केली असून, मेघडंबरीत ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान होईल. ३० फूट उंच व १४ बाय १४ चा हा रथ असेल. त्यावर आकर्षक नक्षीकाम असल्याची माहिती अध्यक्ष श्याम मानकर यांनी दिली.
https://maharashtrabulletin.com/pmc-ready-for-visarjan-pune/
हुतात्मा बाबुगेनू मंडळाने यंदा ओडिशा, भुवनेश्वर येथील पुरातन गणेश मंदिर रथ केला आहे. २६ फूट उंच, २४ फूट लांब व १६ फूट रुंद हे मंदिर असून, सप्तरंगातील दिव्यांनी ते उजळून निघेल, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. अखिल मंडई मंडळाने जगदंब रथ साकारला आहे.
https://maharashtrabulletin.com/ganpati-festival-pune-visarjan/
तर नेहरू तरुण मंडळाने ३० फूट उंचीचा महोत्कट गणेश रथ केला असून, त्यावर अडीच लाख एलईडी दिवे बसविले असल्याची माहिती कार्याध्यक्ष पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली.