Skip to content Skip to footer

ढोल पथक कमवत आहेत करोडो रुपये, डीजे बंदीचा ढोल पथकांना फायदा

कामशेत – सरकारने डीजेवर बंदी घातल्याने बहुतांशी गणेश मंडळांनी ढोल पथक ना पसंती दिली आहे. मावळातील पथकांसाठी यंदाचा उत्सव भरभराटीचा ठरला. गोवा, कोकण, मुंबई, नाशिक, उल्हासनगर, नगर, पुणे यांसह अन्य शहरांतूनही ढोल-लेझीम पथक चे बुकिंग झाले आहे. त्यामुळे मावळातील अडीचशे पथकांना बिदागीतून सुमारे साडेतीन कोटींची कमाई झाली आहे.

मावळ तालुक्‍यात पूर्वीपासून ग्रामीण भागात ढोल पथकांची परंपरा आहे. आता शहरातही ती वाढू लागली आहे. या पथकांमध्ये मुलींचाही समावेश आहे. मुलीही चांगले वाद्यवादन करू लागल्या आहेत. पथकांना अधिक मागणी वाढू लागली आहे. आंदर मावळात वडेश्वर, माळेगाव, नागाथली, तळपेवाडी, सावळा, कुसवली, कशाळ, कुणे-अनसुटे, कल्हाट, कोंडिवडे, आंबी, बोरवली, डाहुली, सटवाईवाडी, टाकवे यांसह अन्य पथके आहेत.

पवन मावळात सर्वाधिक पथके
महागाव, शिवली, येलघोल, ब्राह्मोली, काले, कौथुर्णे, भडवली, थुगाव, मळवंडी, आंबेगाव, सावंतवाडी, धालेवाडी, लोहगड, शिंदगाव, शिवणे, ओझर्डे, पिंपळखुटे व अन्य गावांत नावाजलेली पथके आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मावळातील या पथकांची तीन महिने अगोदरच विविध शहरांत बुकिंग झाले आहे. मुंबईत श्रीगणेशाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत काही पथके मुक्कामी राहिली आहेत. एका पथकात पन्नास ते साठ वादक आहेत. या पथकांना एक लाखापासून तीन लाखांपर्यंत बिदागी मिळाली आहे. काही पथकांनी एका दिवसात दोन दोन सुपाऱ्या घेतल्या आहेत. तळेगाव, इंदोरी व अन्य गावांत पथके सुरू झाली आहेत. त्यातून मिळणाऱ्या बिदागीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. वडगाव येथील पोटोबा मंदिरात सीटीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे मयूर ढोरे यांनी सांगितले. नाणे मावळातील अध्यक्ष इंदाराम उंडे म्हणाले, ‘‘बिदागीच्या रकमेतून मंदिराची कामे, भजन साहित्य, हरिनाम सप्ताह आदींवर खर्च
केला जातो.’’

https://maharashtrabulletin.com/125-ganpati-festival/

वडगावचे पथक परराज्यात
वडगावचे माजी सरपंच बाळासाहेब ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया ढोल पथक कार्यरत आहे. पथकाचे अध्यक्ष मयूर ढोरे आहेत. या पथकात शंभर मुले व पन्नास मुलींचा समावेश आहे. गोव्यात पथक गेले आहे. पथकाला साडेतीन लाख रुपयांची सुपारी मिळाली आहे. नगर येथील एक लाखाची बिदागीही मिळाली आहे. याचप्रमाणे जयमल्हार, कानिफनाथ, नादसम्राट ही पथकेही नावाजलेली आहेत.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5