Skip to content Skip to footer

गणपती दर्शन झाले हायटेक- #GanpatiBappa ला सुद्धा पडली इंटरनेट ची भुरळ

पुणे – गणेशउत्सव म्हणजे सर्वांचा आवडतीचा सण. सगळीकडे गजबज, जागोजागी गल्लो गल्ली विविध मंडळांचे देखावे आणि हे देखावे पाहण्यासाठी दिवसरात्र होणारी वर्दळ. देखावे पाहण्यासाठी आपण बाहेर पडतो पण सर्वच मंडळाच्या देखाव्यांपर्यंत आपण पोहचू शकत नाही. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिक तर ह्या आनंद पासून खूप दूर आहेत. Skype किंवा whatsapp सारख्या अॅप्लिकेशन च्या माध्यमातून हे लोक गणपती दर्शन घेऊ शकतात पण लाईव्ह गणपती दर्शन घेण्याची मज्जा मिळत नाही.

म्हणूनच सौरभ मुखेकर या पुण्यातील तरुणाने खास गणपती दर्शनासाठी ganpatidarshan.com ही वेबसाइट बनवली आहे. परदेशातील भारतीयांना गणेशउत्सवाचा आनंद लाईव्ह मिळवून देणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून ऑनलाईन गणपती चे दर्शन मिळवून देणे हा या साईट बनवण्या मागचा उद्देश. २०१२ पासून या वेबसाइटला सुरुवात झाली. मागील वर्षा पासून आपल्याला या साईट वर लाईव्ह विसरजन मिरवणूकसुद्धा पहावयास मिळते. ह्या वेबसाईट वर दिवसाला सुमारे ४०-५० हजार लोक येऊन गणपतीचे लाईव्ह दर्शन घेतात.

इथे आपण मुंबई, पुणे आणि देशातील लालबागचा राजा, दगडूशेठ यांसारख्या प्रसिद्ध मंडळांच्या गणपतींचं लाइव्ह दर्शन घेऊ शकतो. ह्या लाईव्ह दर्शनासाठी थर्ड पार्टी API परमिशन घेऊन वापरले आहेत. शिवाय अनेक सेलिब्रिटीजच्या बाप्पांचं दर्शन, प्रसिद्ध ढोल ताशा पथकांचं वादन याची धम्मालही येथे अनुभवता येते. आजकाल परदेशातही गणेशोत्सव साजरे केले जातात. त्यामुळे तिथल्या गणेशोत्सवांचे व्हिडीओ आण‌ि फोटो या साइटवर उपलब्ध आहेत. वेबसाइट वर वर्चुअल गणपती आरती करण्याची सोय आहे.

https://maharashtrabulletin.com/machine-learning-with-python-workshop-in-pune/

सौरभ मुखेकर यांच्याशी बोलताना ते म्हणाले ” रोज येणाऱ्या ५० हजार व्हिसिटर्स मधून ५०-६० टक्के लोक हे भारताबाहेर राहणारे महाराष्ट्रीय लोक आहेत. भारतातील विविध राज्यातील व शहरातील प्रसिद्ध सण लाईव्ह कव्हर करणे, भारतीय संस्कृती जपणे व त्याचे संवर्ध करणे ही ह्या वेबसाईट ची भविष्यातील संधी आहे. ह्या वर्षी ganpatidarshan.com ह्या वेबसाइट मधून मी जाहीरतींच्या माध्यमातून पैसे मिळवून ते सामाजिक कार्यासाठी वापरणार आहोत.”

या वेबसाइटवर तुम्ही काढलेले बाप्पांचे फोटोही अपलोड करू शकता. तुमचे फोटो आणि व्हिडीओ #GanpatiBappa असा हॅशटॅग वापरून फेसबुक, इन्स्टाग्रॅमवर पोस्ट केले की ते या वेबसाइटवर झळकू शकतील. (टीप. ह्या साठी आपले आपले Instagram अकाउंट पब्लिक असणे गरजेचे आहे). ganpatidarshan.com ह्यांच्या फेसबुक पेज वर जगभरातील नागरिकांनी काढलेल्या गणपतींचं जगातील सर्वात मोठा संग्रह आहे.

वेबसाइट पाहण्यासाठी करण्यासाठी ganpatidarshan.com ह्या लिंक वर क्लिक करा.

फेसबुक पेज – https://www.facebook.com/GanpatiDarshan/

अवश्य भेट द्या – आम्ही पुणेकर

Leave a comment

0.0/5