मुंबई: देशाच्या पहिल्या फुलटाईम संरक्षणमंत्री म्हणून सीतारमण यांची नियुक्ती झाली आहे. इंदिरा गांधींनंतर देशाच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला मंत्र्याच्या खांद्यावर आहे आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे.
देशाच्या पहिल्या फुलटाईम संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण
रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, निर्मला सीतारमण या गुगल इंडियावर सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती ठरल्या.
कालच उत्तर कोरियानेही हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. त्यामुळे उत्तर कोरिया आणि निर्मला सीतारमण हे सर्चमध्ये अव्वल होते. या चुरशीत निर्मला यांनीच बाजी मारली.
https://maharashtrabulletin.com/brics-china-india-pakistan-terrorism/
देशाच्या नव्या संरक्षणमंत्री सीतारामन यांची ओळख
निर्मला यांचं नाव संरक्षण मंत्री म्हणून टीव्ही वाहिन्यांवर जसं जाहीर झालं, तसं गुगल सर्चकडे नेटीझन्सनी उड्या घेतल्या.
सकाळी 9.30 वाजल्यापासून निर्मला सीतारमण यांना गुगलवर सर्च करण्यास सुरुवात झाली. त्यांच्यापाठोपाठ मग पियूष गोयल आणि अल्फोन्स कन्नाथम यांचा गुगल सर्चमध्ये नंबर लागला.
महत्त्वाचं म्हणजे निर्मला सीतारमण यांना गुगलवर सर्च करण्यात गोवा अव्वल होतं.
तामिळनाडूत सर्च नाही
निर्मला या मूळच्या तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथल्या आहेत. बहुधा तामिळनाडूवासियांना त्यांच्याबद्दल माहिती असल्याने, त्यांनी गुगल सर्च करणं टाळलं असावं. त्यामुळे तामिळनाडूत सीतारमण या गुगल सर्चमध्ये पिछाडीवर पडल्या.
सर्वाधिक सर्च गोव्यात
निर्मला सीतारमण यांच्याबाबत गुगल सर्च करण्यात गोवा अव्वल स्थानावर राहिला. गोव्यातील 100 लोकांनी त्यांच्याबाबत जाणण्याचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ उत्तराखंड 55, हिमाचल प्रदेश 50 यांचा नंबर लागतो.
टॉप 20 मध्ये मोदी कॅबिनेट
गुगल इंडियावर रविवारी मोदी कॅबिनेट आणि मंत्री सर्वाधिक सर्च करण्यात आले. गुगल इंडियावर सर्च करण्यात आलेल्या टॉप 20 विषयांमध्ये 18 विषय हे मोदी कॅबिनेट आणि त्यासंबंधी होते. अन्य विषयांमध्ये उत्तर कोरिया आणि ब्रिक्स संमेलन यांचा समावेश होता.
एका दिवसात लाखो फॉलोअर्स वाढले
निर्मला सीतारमण या ट्विटरवर केवळ 487 जणांना फॉलो करतात. तर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या 15 लाख 38 हजार 550 इतकी पोहोचली आहे.
महत्त्वाचं म्हणजे काल एकाच दिवसात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1,40,730 ने वाढली.
ट्विटरवर मोदी सरकारचा जलवा
मंत्रिमंडळ फेरबदलानंतर ट्विटरवर मोदी सरकारचा जलवा पाहायला मिळाला. मोदी मंत्रिमंडळाबाबत रविवारी 22.7 हजार ट्विट करण्यात आले.
यादरम्यान ##मंत्री_नहीं_पीएम_बदलो हा हॅशटॅगही ट्रेंण्ड झाला. हा हॅशटॅग 4897 लोकांनी ट्विट केला होता.