Skip to content Skip to footer

शरद पवार यांनी हवामान खात्याला 100 किलो साखर पाठवली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली.

हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्याने, पवारांनी दिलेला शब्द पाळला.

वेधशाळेने दिलेला अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असं पवार उपरोधाने म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे पवारांनी बारामतीवरुन 100 किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला.

शरद पवार काय म्हणाले होते?

“मान्सून लांबला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकांनी काल सांगितले की, येत्या चार दिवसा उ. महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पडेल. त्यांचा हा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन.”, असे पवार म्हणाले होते.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5