Skip to content Skip to footer

कुरुळी येथे भरधाव कारने ज्येष्ठ नागरिकास चिरडले

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत ओम लॉजिस्टिक समोर रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास भरधाव कारने जागीच चिरडले. व अपघातानंतर कारचालक कारसह निघून गेला. याप्रकरणी अज्ञात कार चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दि. ४ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कुरुळी येथील ओम लॉजिस्टिक कंपनीसमोर झाला. रामेश्वर चौथुजी जाजोट ( वय ६०, रा. काळभोरनगर, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, पुणे ) असे अपघातात ठार झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार संजय घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष पवार हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a comment

0.0/5