Skip to content Skip to footer

दक्षिण मध्य मुंबईत आक्रमक प्रचारामुळे राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित

दक्षिण मध्य मुंबईत जाहीर लढत ही शिवसेना आणि काँग्रेस पक्षातच असताना दिसून येत आहे. महायुती कडून खासदार राहुल शेवाळे तर महाआघाडी कडून एकनाथ गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. परंतु दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप महाआघाडीला वातावरण अतिशय अनुकूल आहे. शिवसेनेने केलेली लोकहिताची कामे, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा प्रचारातील समन्वय आणि अतिशय नियोजनपूर्ण व आक्रमक प्रचार तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा क्षीण पडलेला प्रचार यामुळे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे राहुल शेवाळे यांचा झंजावत प्रचार तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्र्वादीतील अंतर्गत वादामुळे गायकवाड यांच्या प्रचारसभेला गर्दी कमी दिसू लागलेलीं आहे. विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी खूप लवकर जाहीर झाल्यामुळे त्यांनी दीड-दोन महिन्यांपूर्वीच प्रचार सुरू करून आघाडी घेतली होती तर दुसरीकडे या जागेवर काँग्रेस तर्फे गायकवाड , मुंगणेकर आणि खोब्रागडे यांच्यात रस्सीखेच चालू झाली होती. त्यातच एकीकडे गायकवाड यांचा प्रचार चालू झालेला असतानाच काँग्रेस आमदार कोळंबकर यांनी शेवाळे यांना पाठीबा जाहीर केल्यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघात फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे गायकवाड यांची प्रचाराची मदार काँग्रेस कार्यकर्त्यांवरच आहे, पण काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारात कार्यकर्ते एकदिलाने काम करताना दिसत नाहीत. या मतदार संघात काँग्रेस पक्षातच एकमत नसल्यामुळेच महानगर पालिकेच्या नगरसेवक निवडणुकीला काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षात नसलेल्या एकीचा फटका गायकवाड यांना लोकसभा निवडणुकीला बसणार असेच बोलेल जात आहे.

Leave a comment

0.0/5