पश्चिम बंगाल मध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे सर्वच स्तरातून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका होताना दिसत आहे. त्यातच आता शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर अधिकार शाहीचा वापर करत असल्याचे थेट आरोप लगावले आहेत. तसेच पुढे बोलतात राऊत म्हणाले की, जर देशाच्या लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये हिंसाचार होणार असेल तर आम्ही जगामध्ये सर्वात मोठी आणि मजबूत आमची लोकशाही आहे, हे कुठल्या तोंडाने सांगायचे. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संजच राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ममता बॅनर्जींचा जर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याविषयी राजकीय विरोध असेल तर, त्यांना अहमदाबादेत जाण्याचा पुर्ण अधिकार होता. त्यांनी गांधीनगरला, सुरतला किंवा इतर राज्यात जायला हवे होते प्रचारासाठी. परंतु, त्या गेल्या नाहीत. जर तो अधिकार घटनेने ममता बॅनर्जींना दिला आहे तर तोच अधिकार अमित शहा, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ अशा भाजपाच्या सगळ्या नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचार किंवा रोड शो करण्याचा पुर्ण अधिकार आहे. अशा प्रकारे या देशाच्या लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये जर हिंसाचार होणार असेल तर आम्ही जगामध्ये सर्वात मोठी आणि मजबूत आमची लोकशाही आहे, हे कुठल्या तोंडाने सांगायचे असा प्रश्न सुद्धा राऊत यांनी उपस्थित केला आहे.