Skip to content Skip to footer

बारामतीचे बेकायदेशीर पाणी रोखले……

बारामती तालुक्याला मिळणारे बेकायदेशीर पाणी रोखण्यात आलेले आहे. नीरा डाव्या कालव्याच्या वादप्रकरणी राज्य सरकारने बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश काढले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार, असे वक्तव्य केले होते. नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वारंवार पाठपुरावा केला होता. त्‍यानंतर महाजन यांनी आदेश काढले आहेत. या आदेश नंतर पवार काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

माढ्‍याला पाणी देण्‍याचे आदेश निघाल्‍यानंतर सातारा जिल्ह्यातील भाटघर, नीरा-देवघर, वीर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायमस्वरूपी बंद होणार आहे. याचा फायदा फलटण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला या तालुक्यांना होणार आहे.
नीरा देवधर धरणातून ६ टीएमसी पाणी बारामती, इंदापूर तालुक्याला तर ५ टीएमसी पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळत होते. आता ११ टीएमसी पाणी माळशिरस, सांगोला, फलटण, पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे. आता या निर्णयानंतर शरद पवार काय भूमिका घेतात, याची उत्‍सुकता लागून राहिली आहे.

Leave a comment

0.0/5