Skip to content Skip to footer

भाजपा पाठोपाठ शिवसेना पक्षात सुद्धा लवकरच मेघा भरती

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक डिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे कोळंबकर तर राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, वैभव पिचड आणि चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला आता त्या पाठोपाठ शिवसेना पक्षात सुद्धा येणाऱ्या दिवसात मेगा भरती होणार आहे. अशी माहिती खात्रीदायक सूत्रांकडून समोर आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार असेच काहीसे चित्रा राज्यात दिसून येणार आहे.

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांनी कलिनातून इच्छुक म्हणून अर्जही केला नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे मालाडचे विद्यमान आमदार अस्लम शेख शिवसेनेत जाण्याची चर्चा असतानाच शेख यांनी मुलाखतीला दांडी मारली. कृपाशंकर सिंग आणि अस्लम शेख मुलाखतीला न आल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कृपाशंकर सिंग भाजपात, तर अस्लम शेख हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेने मुंबईत वाट्याला येणारे मतदारसंघ मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यातच इतर पक्षांमधूनही शिवसेनेत काही नेते जाणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर राज्यातील काही मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे कुटुंबही शिवसेनेत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नाईक कुटुंबाच्या रुपाने शिवसेनेला विदर्भात बळ मिळणार आहे

Leave a comment

0.0/5