Skip to content Skip to footer

काही तासांत, जेफ बेझोस यांना मागे टाकून बिल गेट्स पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

जेफ बेझोस 90 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बुधवारी काही तासांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले.

फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग यांच्या मते, अमेझॅनच्या सीईओची बाजारपेठेतील संपत्ती बुधवारी दिवस अखेर जवळपास ८९ अब्ज डॉलर्सची होती, तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची संपत्ती केवळ ९० अब्ज डॉलर्स इतकी होती.

जरी बेझोस काल काही तास साठीच जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले असले तरी आगामी काळात आणि आठवड्यांत ते कायमस्वरूपी गेट्सना पिछाडीवर टाकतील.

22 वर्षापूर्वी गॅरेजमधून पुस्तके विकण्यास सुरुवात करणाऱ्या बेझोस यांनी तब्बल सात वर्षे गेटस कडे असलेले शीर्षक काल काही तासांसाठी घेतले होते आणि फोर्ब्सच्या मते गत 30 वर्षांपासून “सर्वात श्रीमंत व्यक्ती” शीर्षक ठेवणारा तो सहावा व्यक्ती आहेत.

Leave a comment

0.0/5