Skip to content Skip to footer

दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग , व्होडाफोनची ऑफर

नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने दमदार ऑफर आणली आहे. व्होडाफोन च्या प्रीपेड ग्राहकांना 348 रुपयात 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.

सध्या ही ऑफर केवळ राजस्थानसाठी आहे. डेटा वापरण्यासाठी दररोज 1GB ची कमाल मर्यादा असेल. ग्राहकाकडे 4G मोबाईल नसेल, तर 3G/2G डेटा मिळेल.

व्होडाफोन नने याशिवाय स्टुडेंट सर्व्हाईव्हल किट हा 352 रुपयांचा प्लॅनही आणला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 84 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB डेटा आणि इतर सुविधा मिळणार आहेत.

अवश्य वाचा – रिलायन्स कम्युनिकेशनचा नवा प्लॅन, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग!

अगोदर 445 रुपयांमध्ये पहिला रिचार्ज केल्यानंतर 352 रुपयांमध्ये हा प्लॅन घेता येईल.

व्होडाफोन स्टुडेंट सर्व्हाईव्हल किट ही दिल्ली-एनसीआरमधील विद्यार्थ्यांसाठी प्लॅन आहे. पहिल्यांदा 445 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल, त्यानंतर 84 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB डेटा आणि इतर सुविधा मिळतील.

मोफत व्हॉईस कॉलिंगसाठी व्होडाफोन नेही मर्यादा ठेवली आहे. दररोज 300 मिनिट, तर आठवड्याला 1200 मिनिटे वापरता येतील.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5