Skip to content Skip to footer

भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला कसोटी सामना, दिवस ४: भारताचा श्रीलंके वर ३०४ धावांनी विजय

गॉल येथील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने श्रीलंकेवर 304 धावांनी विजय मिळविला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. चैथ्या दिवशी विराट कोहलीने आपले १७ वे शतक पूर्ण केले, अजिंक्य रहाणेने 23 धावांवर नाबाद राहिला भारताने 3 बाद 240 अशी धावसंख्या उभारून डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला आणि ५४९ धावांचे लक्ष्य श्रीलंकेला दिले. फलंदाजीस सुरुवात करताना श्रीलंकेने लवकरच आपले पहिल्या फळीतील फलंदाज गमावले. सलामीवीर दिमुथ करूररटेने ९७ धावांची खेळी केली, रविचंद्रन अश्विनने त्याला बाद केले. भारताच्या अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला व २४५ धावतच श्रीलंकेचा पूर्ण संघ बाद केला.

Leave a comment

0.0/5