पुणे – पुण्याच्या अभिजित कटके याने ‘भारत केसरी’ किताब पटकावला.
कर्नाटकातील जमखंडीत ही स्पर्धा पार पडली.
त्याने अनुक्रमे दिल्लीचा भीमसिंग (७-३), हरियानाचा अनिल कुमार (७-५), हवाई दलाचा सतीश फडतरे (१०-०), उत्तर प्रदेशचा अमित कुमार (८-४) यांना हरविले.
अभिजित कटके ने पाच लढती जिंकल्या.
निर्णायक फेरीत त्याने ‘कर्नाटक केसरी’ शिवय्याला १०-२ असे हरविले.
चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये असे इनाम त्याला मिळाले. अभिजित शिवरामदादा तालमीत भरत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.