Skip to content Skip to footer

बोट अपघातानंतर शिवस्मारकासाठी तीन वेगवेगळ्या जागांचे प्रस्ताव

मुंबई : शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे. या अपघातात एक बळी गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिवस्मारक राजभवन येथे करण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाकडून समोर आली आहे तर माजी व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव यांनी आपली मुंबई या संस्थेद्वारे स्मारक भाऊच्या धक्क्यापासून एक किमी अंतरावर क्रॉस आयलंडवर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने मात्र हे स्मारक आहे त्याच जागी करावे, अशी मागणी केली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र स्मारक नियोजित जागीच करावे असे मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यासाठी त्यांनी प्रस्तावित शिवस्मारक स्थळाभोवतीची समुद्राची भौगोलिक परिस्थिती आणि नेव्हीगेशन रूटचा दाखला दिला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही राव यांनी केला आहे. शिवस्मारकावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरु असताना आता माजी व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप राव यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5