Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसह तानाजी चित्रपट पाहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसह तानाजी चित्रपट पाहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बहुचर्चित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपट पाहणार आहेत. चित्रपटात नरवीर तानाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणसोबत मुख्यमंत्री चित्रपटाचा आनंद घेणार आहेत. मुंबईतील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाहिलं विभागीय मुख्यमंत्री कार्यालय नवी मुंबई येथे सुरु

राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही काल नाशिकमध्ये ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिला. भुजबळांनी ‘तान्हाजी’च्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला होता. आता मुख्यमंत्रीही हा सिनेमा पाहतील. ‘तान्हाजी’ सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा मोहीम फत्ते करताना वीरमरण आलेल्या तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास ‘तान्हाजी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5