Skip to content Skip to footer

पुणेकर ऑनलाईन शॉपिंग करताना हे खबरदारी नक्की बाळगा…

पुणे – टेंडर देण्याच्या बहाण्याने सदाशिव पेठेतील एका तरुणाची ९८ हजार रुपयांची फसवणूक केली.

तर ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने दोघांनी कोथरूडमधील व्यक्‍तीला सहा लाख ७१ हजार रुपयांना लुबाडले.

एखाद्या कंपनीचा ई-मेल हॅक करून त्यांना दुसऱ्या बॅंक खात्यात रक्‍कम जमा करण्यास सांगून लाखो रुपयांना लुबाडले.

अशा प्रकारे ऑनलाइन व्यवहारावरामध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे असे व्यवहार अथवा शॉपिंग करताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गुन्हा करण्याची पद्धत –

सध्या ऑनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.मोबाईल किंवा संगणकावर केवळ छायाचित्र पाहून ऑनलाइन व्यवहाराद्वारे वस्तू मागविली जाते. पण बऱ्याचदा वेगळीच वस्तू किंवा बनावट वस्तू पाठवून फसवणूक केली जाते.

अनेकदा स्वस्त दरात वस्तू खरेदी करण्याच्या मोहापायी असे प्रकार घडतात.

वस्तू चुकीची अथवा नादुरुस्त असेल तर काही कंपन्या पैसे परत देतात किंवा हवी ती वस्तू बदलून देतात, पण बोगस कंपन्या संपर्काचे कोणतेच माध्यम ठेवत नाहीत, त्यामुळे फसवणूक झालेला ग्राहक दाद मागू शकत नाही.

काय करावे आणि काय टाळावे?

  • खात्रीलायक संकेतस्थळावरूनच ऑनलाइन व्यवहार करा.
  • डेबिट, क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक हा जन्मदिनांक किंवा फोन क्रमांकाशी जुळता ठेवू नका.
  • प्रत्येक संकेतस्थळासाठी वेगवेगळा पासवर्ड वापरा.
  • स्वयंचलित पासवर्ड सेव्ह करण्याचे ऑप्शन टाळा.
  • पासवर्ड कोठेही लिहून ठेवू नका. ठराविक दिवसांनी पासवर्ड बदला.
  • ऑनलाइन व्यवहार पूर्ण होईपर्यंत संकेतस्थळ बंद अथवा लॉगआऊट करू नका
  • अकाउंट लॉगइन करताना पासवर्ड कोणी बघणार नाही, याची काळजी घ्या
  • सायबर कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणच्या संगणकाचा व्यवहारासाठी वापर करू नका
  • आक्षेपार्ह व्यवहार आढळल्यानंतर पोलिस अथवा बॅंकेत संपर्क साधा.

ऑनलाइन गुन्हा घडल्यावर ही खबरदारी घ्या

ऑनलाइन व्यवहार करताना फसवणूक झाल्यास तातडीने बॅंकेत कळवून डेबिट/क्रेडिट कार्ड ब्लॉक करा.
फसवणूक झालेली रक्‍कम कोणत्या खात्यात हस्तांतरित झाली, याची माहिती घेऊन सायबर सेलकडे तक्रार करा.

संकेतस्थळाचे नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी आणि यूआरएल क्रमांकाची माहिती पोलिसांना द्या. शक्‍य झाल्यास त्याचे स्क्रीन शॉट्‌स घ्या.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5