Skip to content Skip to footer

Gold Price today: आज पुन्हा स्वस्त झालं ‘सोनं’, खरेदी करण्याची चांगली संधी, जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र बुलेटिन : आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोने ११० रुपयांनी घसरून ४७७३० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार करीत आहे. त्याचबरोबर मार्चमध्ये चांदीचा वायदा व्यापार ३९७.०० रुपयांच्या वाढीसह ६९,९४०.०० रुपयांच्या पातळीवर आहे. याव्यतिरिक्त इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील आज घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेमध्ये सोन्याचा व्यापार ६.२१ डॉलरच्या घसरणीसह १,७९६.८७ डॉलर प्रति औसच्या दरावर बंद झाला. त्याचवेळी, चांदीचा व्यापार ०.०६ डॉलरच्या तेजीसह २७.९९ डॉलरच्या पातळीवर होता.

दिल्लीमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या किमती

राजधानी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत १०० रुपयांनी घसरून ४५,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ९० रुपयांनी घसरून ५०,०९० रुपये प्रति १० ग्रॅम वर आहे.

मुंबईमध्ये सोन्याच्या किंमती

याव्यतिरिक्त मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,७७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ११० रुपयांच्या घसरणीसह ४६,७७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

दिल्ली सराफा बाजारात किंमत

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतीत १४८ रुपये प्रति १० ग्रॅमची घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे नवीन दर आता ४६,३०७ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. त्याचबरोबर चांदी ८८६ रुपयांनी घसरून ६८,६७६ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली होती.

का होत आहे घसरण?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉलरच्या तुलनेत रुपया आज सुमारे १२ पैशांनी मजबूत झाला. यामुळे भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती कमी झाल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या उच्च किंमतीवर भारतीय गुंतवणूकदारांनी नफा कमावला. यामुळे देखील दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले.

Leave a comment

0.0/5