Skip to content Skip to footer

जुडवा २ चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: शेवटी बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज “Judwaa 2” या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९७ सालच्या डेविड धवन दिग्दर्शित जुडवा या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला सलमान खान जुळ्या रूपामध्ये करिष्मा कपूर आणि रंभा या नायिकासोबत रोमान्स करताना दिसला.

Judwaa 2 मध्ये वरून धवन  हा “राजा ” आणि ” प्रेम ” अशा दुहेरी भूमिकेत जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू सोबत रोमान्स करताना दिसेल. ही दोन जुळ्या भावांची कथा असून ते जन्मतःच वेगळे झालेले दाखवलेले आहेत. एका विशिष्ट पद्धतीने या दोन्ही भावांची आयुष्ये एकमेकांशी जोडली गेलेली असल्यामुळे यातून निर्माण होणारे अनेक गमतीशीर प्रसंग आपल्याला ट्रेलर मध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटामधील  ” ऊंची हैं बिल्डिंग ” आणि “ टन टना टन ” ही दोन्ही गाणी ९० च्या दशकाची नक्कीच आठवण करून देतील. अजुन एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपला आवडता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत वरुण बरोबर एका गाण्यावर थिरकताना दिसेल .

एकंदरीत काय तर डेविड धवन दिग्दर्शित हा चित्रपट, जो की २९ सप्टेंबर ला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल नक्कीच फॅमिली entertainer असेल यात काही शंकाच नाही .

https://maharashtrabulletin.com/songs-marathi-sunnyleone/

 

ट्रेलर लाँच विषयी अजुन माहितीसाठी इथे क्लिक करा.

 

Leave a comment

0.0/5