“आढळराव पाटील खासदार म्हणून चालतील पण हा बाहेरचा कोल्हे नको” लांडे समर्थकांची मागणी

Kolhe-Lande-Adhalrao-Mahrashtrabulletin-राष्ट्रवादी

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या हातातील शिवबंधन तोडून शिवसेना पक्षाला राम-राम ठोकत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रावादी नेते अजित पवार यांनी जाहीर सभेत थेट आवाजी मतदान घेतले व कोल्हे यांची उवउमेदवारी जवळजवळ निश्चित केली. मात्र दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे यांना ऐनवेळी डावलण्यात येत असल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश आंबटच!

राष्ट्रवादीच्या चालू सभेत डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारी बद्दल बोलताना लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातलेला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या अजित पवारांनी आ. लांडे यांच्या समर्थकांना सज्जन दमच दिला होता परंतु लांडे समर्थक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नसताना दिसत होते. तसेच कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार लांडे यांच्या चेहऱ्यवर नाराजी सभेतच दिसून येत होती. डॉ. कोल्हे यांचा शिरूर मतदार संघाशी काहीही संबंध नाही तसेच मागील काही महिन्यांपासून माजी आमदार विलास लांडे लोकसभेची तयारी करत असताना दिसून येत होते.

VIlas-lande-volnteers

शिरूर लोकसभा मतदार संघात आ. विलास लांडे यांना उमेदवारी मिळाली तरच राष्ट्रवादीचे काम करू नाही तर करणार नाही अशीच काहीशी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यानी घेतलेली आहे व तसे मेसेज सुद्धा राष्ट्रवादीच्या स्थानिक व्हाटसअँप ग्रुप मध्ये दिसत आहेत.

बाहेरूनआलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांचे काम करणार नाही त्या पेक्षा खा. शिवाजीराव पाटील हे पुन्हा खासदार म्हणून आम्हाला चालतील अशीच काहीशी भूमिका तेथील राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here