Skip to content Skip to footer

या दोन लोकांना तुम्ही फेसबुक वर ब्लॉक करू शकत नाही…

सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकवर आता तुम्हाला दोन स्पेशल व्यक्तींना ब्लॉक करता येणार नाही आहे. कारण, फेसबुकने या दोन व्यक्तींसाठी तशी खास व्यवस्था केली आहे.

फेसबुकच्या या नव्या व्यवस्थेमुळे फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चानला आता फेसबुक वर ब्लॉक करता येणार नाही.

वास्तविक, या दोघांचंही फेसबुक प्रोफाईलला अनेकवेळा ब्लॉक केलं गेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियातील फेसबुक या दिग्गज कंपनीने आता ही नवी व्यवस्था केली असून, ज्यामुळे या दोघांनाही आता फेसबुकवर ब्लॉक करता येणार नाही.

https://maharashtrabulletin.com/whatsapp-rollsout-colorful-text-status/

जेव्हा एखादी फेसबुक पोस्ट तुम्हाला पाहायची नसते, तेव्हा फेसबुक यूजर्ससाठी अनफ्रेण्ड किंवा संबंधित फेसबुक यूजर्सला ब्लॉक करण्याचा ऑप्शन दिला जातो. पण जर तुम्ही मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिलाला फेसबुकवर ब्लॉक करु पाहात आहात, तर तुम्हाला ब्लॉक एरर मेसेज येईल.

ज्याचा अर्थ झुकरबर्ग आणि प्रिसिलाचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावा लागेल.

दरम्यान, झुकरबर्ग आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन वैयक्तीक आयुष्यातील अनेक किस्से, घटना-घडामोडी फेसबुकवर शेअर करत असतो. पण ज्यांना हे जाणून घेण्याची इच्छा नसेल, त्यांना यापुढे झुकरबर्गच्या पोस्ट नाईलाजास्तव पाहाव्याच लागतील.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5