Skip to content Skip to footer

रिंगरोड चा मार्ग अडथळ्यातून..!!

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या रिंगरोड मार्गावर काही ठिकाणी महापालिकेने बांधकाम परवानगी दिल्या आहेत ह्या मध्ये वारजे वडगावसह तीन ठिकाणांचा समावेश आहे. पीएमआरडीएने महापालिकेस परवानग्यांची पुनर्तपासणी करून त्याबाबतची माहिती देण्यास सांगितले आहे. परवानग्या महापालिकेतून अधिकृतरीत्या दिल्या असल्यास रिंग रोडच्या मार्गात पुन्हा बदल करावा लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएने प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांच्या हरकती-सूचना मागवून या रिंगरोडची मार्गिका अंतिम करण्यात आली आहे. १२९ किलोमीटर लांबीच्या या रिंगरोडचा काही भाग महापालिकेच्या हद्दीतून वारजे, वडगाव आणि आणखी एका गावातून जातो. त्या भागात महापालिकेने रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गावर काही ठिकाणी परवानगी दिली आहे.

Leave a comment

0.0/5