Skip to content Skip to footer

Royal Enfield च्या दोन शानदार बाईक, 650 CC चं दमदार इंजिन

मिलान :इटलीच्या मिलानमध्ये 7 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या EICMA मोटार शोमध्ये अखेर Royal Enfield ने दोन दमदार बाईकवरुन पडदा उठवला. या मोटार शोमध्ये Royal Enfield इंटरसेप्टर आयएनटी 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 ट्विन सादर करण्यात आल्या.

पॉवर बाईक क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने 650 सीसीचं नवं इंजिन आणलं आहे. या बाईक सर्वात आधी युरोपमध्ये लॉन्च केली जाणार आहे. तर 2018 च्या जून-जुलै महिन्यात या बाईक भारतात लॉन्च केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दोन्ही बाईकचा लूक अतिशय शानदार आहे. या दोन्ही बाईक पाहून इंटरसेप्टर मार्कची आठवण होते. मात्र दोन्ही बाईकमध्ये फक्त पाच टक्केच समानता आहे.

नव्या इंजिनाबाबत रॉयल एनफील्डचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितलं की, “हे दमदार इंजिन 7500 आरपीएमपर्यंत जातं. यामुळे बाईकचा वेग प्रतितास 130 ते 140 किमीपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो.”

Interceptor 650 ची किंमत सुमारे 3 लाख!

नव्या रॉयल एनफील्ड Interceptor 650 ची किंमत सुमारे 3 लाख रुपये असू शकते. मात्र प्रतिस्पर्धी हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट 750 च्या किंमतीपेक्षा ही किंमत अतिशय कमी आहे. हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट 750 ची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे.

या दोन्ही बाईकमध्ये फर्स्ट मॉडर्न रॉयल एनफील्ड 650 ट्विन इंजिन आहे. बाईकमध्ये 8 वॉल्व्ह, एअर/ऑईल कूल्ड, 648CC पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे 47bh आणि 52 Nmचा टॉर्क देतं.

 

Royal-Enfield-Interceptor-INT-650

Royal Enfield Interceptor INT 650

नव्या रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर INT 650 मध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे, जे या बाईकसाठी खास तयार करण्यात आलं आहे. या मोटरसायकलचं चेसिस रॉयल एनफील्डच्या UK टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये डेव्हलप केलं आहे. Interceptor INT 650 सादर करताना रॉयल एनफील्डचे सीईओ सिद्धार्थ लाल म्हणाले की, “Interceptor INT 650 ही मोटरसायकर रायडिंगचा शानदार अनुभव देईल.”

कॉन्टिनेंटल GT 650 मध्ये ABSसह  फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक

Royal-Enfield-Interceptor-INT-650

Interceptor INT 650 सोबतच रॉयल एनफील्डने कॉन्टिनेंटल GT 650 ही सादर केली आहे. या बाईकचं इंजिन, चेसिस आणि रनिंग पार्ट्स ट्विनसारखेच आहेत. Interceptor INT 650 प्रमाणेच कॉन्टिनेंटल GT 650 मध्ये ABS सह फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक आहेत.

Royal-Enfield-Interceptor-INT-650-1

रॉयल एनफील्डचे अध्यक्ष रुद्धतेज सिंह यांनी कॉन्टिनेंटल GT आपली आवडती बाईक असल्याचं सांगितलं. “रॉयल एनफील्डच्या पोर्टफोलियोमध्ये GTआयकॉनिक मोटरसायकल आहे. 2013 मध्ये या लॉन्चनंतर कॉन्टिनेंटलने सातत्याने आपली पकड मजूबत केली आहे,” असं सिंह म्हणाले.

कॉन्टिनेंटल GT 650, इंटरसेप्टर INT 650 या दोन्ही बाईक अनेक रंग, स्टँडर्ड, रेट्रो कस्टम स्टाईलमध्ये उपलब्ध होतील.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5