Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

dagadusheth-halwai-ganpati

लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीने फिटले डोळ्यांचे पारणे

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत पुणेकर गणेशभक्तांनी लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. पुणे - ऐश्‍वर्याचे प्रतीक असलेल्या आणि लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या धूम्रवर्ण रथात विराजमान झालेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची श्रींची विलोभनीय मूर्ती, तर महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीच्या रूपात साकारलेल्या जगदंब रथात विसावलेली अखिल मंडई मंडळाची शारदा गजाननाची नयनमनोहर मूर्ती मध्यरात्री…

Read More

ganapati-visarjan-miravanuk-crowd

जनसागर लोटला – ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप

ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणूक ची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत असतानाही या जल्लोषी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी लोटलेला भक्तांचा जनसागर, अशा भक्तिमय वातावरणात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची २८ तासांच्या विसर्जन…

Read More

Reliance Industries-Reliance-Industries

Reliance Industries 7 सप्टेंबरला देणार बोनस शेअर

मुंबई: Reliance Industries चा शेअर गेल्या आठ दिवसात 8 टक्क्यांनी वधारला आहे. रिलायन्सच्या जिओसाठी तब्बल 60 लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी 60 लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणाऱ्या रिलायन्स रिटेलने केला आहे. रिलायन्स जिओच्या वाढत्या फोनच्या मागणीमुळे Reliance…

Read More

WhatsApp-Plus-paid

Whatsapp साठी पैसे मोजावे लागणार?

नवी दिल्ली: लवकरच तुमच्यावर बापरे! म्हणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन असलेले Whatsapp वापरण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेले 'व्हॉट्सअॅप' चे सुमारे 100 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 'व्हॉट्सअॅप'साठी पैसे घेण्याची शक्यता आहे. 'व्हॉट्सअॅप'वर पैसे घेतल्यास कंपनीला म्हणजेच 'व्हॉट्सअॅप'ची पालक कंपनी असलेल्या 'फेसबुक'ला यातून…

Read More

airtel-4g-new-voice-calling-plans

अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसाठी Airtel चे 5 रुपयांपासून प्लॅन

मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Airtel ने ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन आणले आहेत. यामध्ये 5 रुपयांपासून 399 रुपयांपर्यंतच्या प्लॅन्सचा समावेश आहे. जिओच्या मोफत व्हॉईस कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Airtel ने हे प्लॅन आणले आहेत. https://maharashtrabulletin.com/airtel-new-plan-unlimited/ 5 रु. – यामध्ये ग्राहकांना 3G/4G डेटा मिळेल. तुम्ही तुमचं सिम 4G मध्ये अपग्रेड केलं तरच या ऑफरला तुम्हाला लाभ घेता…

Read More

दगडूशेठ गणपती-dagduseth-ganpati-accident

दगडूशेठ गणपती च्या देखाव्यावरून तो कोसळला आणि बचावला देखील… !

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेल्या ब्रह्मणस्पती मंदिरावरील कळस उतरविताना क्रेन सर्व्हिसेस मधील राम जाधव (वय २९) यांना शनिवारी (दि.२) मध्यरात्री अपघात झाला होता. विसर्जन मिरवणुकीला अधिक उंचीच्या देखाव्यामुळे अडथळा येऊ नये म्हणून मंडळातर्फे देखाव्याचे शिखर काढण्यात येत होते. गणेश विसर्जन मिरवणुकीकरीता दगडूशेठ गणपतीची मुख्य देखाव्याशेजारील दोन्ही रस्त्यावरील सजावट उतरविताना हा अपघात झाला. कळसावरील…

Read More

गणेशोत्सव-ganpati-decoration-pune

गणेशोत्सव पुणे – धडाडणाऱ्या तोफा आणि शहिदांना सलामी 

पुणे : यंदाच्या गणेशोत्सव मध्ये चहूबाजूंनी धडाडणाऱ्या तोफा...हेलिकॉप्टर व सैनिकांच्या बंदूकांमधून झडणाऱ्या गोळ्या...शत्रूंना संपविण्यासाठी भारतीय जवानांची चाललेली धडपड...'भारत माता की जय'चा जयघोष आणि शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देताना कुटुंबीयांचे भरून आलेले ऊर...भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि चीनच्या वस्तूंवरील बंदी या जिवंत देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. यंदा सामाजिक व संवेदनशील विषयांवरील देखावे आणि विधायक उपक्रमांना…

Read More

Shrilanka Cricket team

सलग पराभवांमुळे वर्ल्ड कप साठी थेट पात्र ठरण्यात श्रीलंका अपयशी

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे एकेकाळच्या विश्‍वविजेत्या श्रीलंका संघ आता आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता फेरीत लढण्याची नामुष्की येण्याची दाट शक्‍यता आहे. दुबई : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे एकेकाळच्या विश्‍वविजेत्या श्रीलंका संघ वर्ल्ड कप साठी थेट पात्र ठरण्यात अपयशी झाला आहे. दोन वर्षांनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी यजमान संघ वगळता एकदिवसीय क्रमवारीत पहिले सात संघ थेट पात्र…

Read More

पावसामुळे-mumbai-rains-pune-rain

पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित

पुणे : मुंबईत झालेली अति पावसामुळे आणि इगतपुरी-कल्याण रेल्वे मार्गावर दुरांतो गाडीचे डबे घसरल्याचा फटका पुणे-मुंबई दरम्यानच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मंगळवारी बसला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या किंवा मुंबईमार्गे देशाच्या अन्य भागांत जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या उशिराने धावल्या. मुंबईकडून सायंकाळी पुण्याकडे येणाऱ्या चार गाड्या रद्द झाल्या. दरम्यान, उद्या (ता. 30) मुंबईकडे जाणाऱ्या आठ गाड्या रद्द केल्या आहेत.…

Read More

बाबूराव सणस पहिले महापौर यांचा पुतळा बसवायचा नसेल, तर परत द्या ! 

पुणे : शहराचे पहिले महापौर बाबूराव सणस यांचा पुतळा महापालिकेच्या प्रांगणात बसविण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडल्यामुळे हा पुतळा परत मिळावा, अशी मागणी पहिल्या महापौरांचे पुत्र सुभाष सणस यांनी महापालिकेकडे केली आहे. तर सणस यांचा पुतळा लवकरच महापालिकेच्या प्रांगणात बसविण्यात येईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी दिली. बाबूराव सणस हे पुण्याचे 1951-52 मध्ये महापौर होते. त्या…

Read More