मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोघांच्या अभिनयाने लोकप्रिय झालेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेचं सिक्वेल वगैरे येणार नसून, मालिका झी टीव्हीवर रि-टेलिकास्ट केले जाणार आहे.
प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव ‘पवित्र रिश्ता’ मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय झी…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सईने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली असून तिने तब्बल दहा किनो वजन वाढवलं आहे.
दिग्दर्शक तबरेज नूरानीच्या आगामी 'लव्ह सोनिया' मध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. मुलांची तस्करी या विषयावर हा चित्रपट बेतला आहे. या सिनेमात ती वेश्या…
नवी दिल्ली : टी-सीरिजचा गायक गुरू रंधावा याला यूट्युबवरील सर्व चॅनेल्सवर तीन बिलियनहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. अशारितीने गायक-रॅपर हनी सिंग आणि बादशाह यांना मागे सोडत गुरू रंधावा यूट्युबवर सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला गायक बनला आहे. चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल गुरूने त्यांचे आभार मानले आहेत.
गुरुने 'सूट सूट', 'हाय रेटेड गबरू', 'लाहोर' आणि 'बन जा तू…
मुंबई : 'टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टुंग' ही गाण्याची धून वाजली की डोळ्यासमोर येणारा एकमेव चेहरा म्हणजे दिग्गज अभिनेते विजय चव्हाण यांचा. 'मोरुची मावशी' नाटकामुळे लोकप्रिय झालेल्या विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. फुफ्फुसाच्या आजारामुळे फोर्टिस रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा…
मुंबई :'मैंने प्यार किया'फेम अभिनेत्री भाग्यश्री चा मुलगा अभिमन्यू सुद्धा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'मर्द को दर्द नहीं होता' सिनेमातून अभिमन्यूची बॉलिवूड एन्ट्री निश्चित झाली आहे. या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.
'मर्द को दर्द नहीं होता'च्या ट्रेलरवरुन सिनेमाच्या कथानकाचा अंदाज बांधता येतो. कुठल्याही शारीरिक वेदना न होणाऱ्या पुरुषाची ही कहाणी असल्याचे दिसते. फूटपाथवरुन…
मुंबई : अर्जुन रामपालला पहिल्यांदाच भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या रुपात पाहता येणार आहे. अर्जुन रामपाल भारत-चीन युद्धावर आधारित 'पलटन' सिनेमात दिसणार आहे. अर्जुनचं रिअल लाईफमध्येही भारतीय सैन्यासोबत जुनं नातं आहे. त्याचे आजोबा ब्रिगेडियर गुरदयाल सिंह यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्मीसाठी आर्टिलरी गन डिजाईन केली होती. दरम्यान अर्जुनच्या वडिलांचा या क्षेत्राशी फारसा संबंध नाही.
अर्जुन रामपाल गुर्जर समाजातील असून त्याचं…
मुंबई : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु ‘राधे माँ’ आता छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतेय. राधे माँचे अनुयायी सर्वसामान्य लोकांपासून अगदी टेलिव्हिजन क्षेत्रातही आहेत. याचाच फायदा घेत, राधे माँ आता ‘राह दे माँ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
राधे माँ ज्या वेब सीरिजमध्ये काम करतेय, ती काही धार्मिक किंवा आध्यात्मिक सीरिज नाहीय, हे मुद्दाम इथे नमूद करायला हवे. आणि…
मुंबई : सलमान खानने 'लव्हरात्री' चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. या सिनेमातून सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
टीझरप्रमाणेच सलमानने ट्रेलरही इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये ट्वीट करत शेअर केला आहे. 'लवरात्रि - यह कहानी है प्यार और मोहब्बत की' असं कॅप्शन सलमानने दिलं आहे. 5…
मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि चॉकलेट अभिनेता रणबीर कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं दिसत आहे. त्यामुळे कपूर कुटुंबाची सून झाल्यास आलिया भटही बॉलिवूडला रामराम ठोकणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला. त्यावर आलियानेही छान उत्तर दिलं आहे.
इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग'मुळे अनेक चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रेटींना प्रश्न विचारायला लागले आहेत. आलियानेही चाहत्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची…
मुंबई : अनुपम खेर यांच्या आगामी 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. 34 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने त्यांना बेड्या ठोकल्या. विजय गुट्टे यांना जीएसटी कायद्याच्या कलम 132 (1) (क) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
विजय गुट्टे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. सध्या ते…