Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

मुसळधार पावसामुळे राज्यात पुढील पाच दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी…

महाराष्ट्र बुलेटिन : मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये शनिवारपासून पावसाचा कहर सुरूच आहे, त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान रविवारी पावसाने थोडी उघडीप दिल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली होती, मात्र रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला. तसेच सोमवार सकाळपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुन्हा रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान विक्रोळ ते कांजूरमार्ग…

Read More

जिल्हाप्रमुख माउली आबा कटके यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यात आणि शहरात शिवसंपर्क दौऱ्याचे आयोजन

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात आता ठाकरे सरकारनं केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिरूर तालुक्यात आणि शहरात शिवसंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माउली आबा कटके म्हणाले की, पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात शिवसंपर्क मोहीम सुरु झालेली असून आपल्या शिरूर…

Read More

जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सुरु केलेल्या ‘शिवसंपर्क अभियान’ दौऱ्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यभरात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर पुणे जिल्ह्यात माजी खासदार तथा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांनी देखील या अभियानाचे आयोजन केले आहे. जनतेच्या मनातील शिवसेने विषयीचा विश्वास हेच आपले स्वबळ आहे आणि ते वाढवा, असे आवाहन शिवसेना…

Read More

उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार १० वीचा निकाल, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : महाराष्ट्र एसएससी निकाल उद्या १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावीचे सुमारे १५ लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahahsscboard.in जाहीर करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचे…

Read More

ठाकरे सरकारनं पीकविमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राला पाठवला प्रस्ताव

महाराष्ट्र बुलेटिन : राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवता यावा यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. दादा भुसे यांनी सांगितले की, आज म्हणजेच १५ जुलै ही पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची…

Read More

महाराष्ट्र शासनाने डॉक्टर व आरोग्य अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय २ वर्षांनी वाढविले

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यातील डॉक्टर व आरोग्य अधिकारी यांचे वय २ वर्ष वाढविण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने बुधवारी मान्यता दिली. आता राज्याचे आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन वयाच्या ६२ व्या वर्षी निवृत्त होतील. त्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे होते. तथापि, या प्रस्तावाच्या अगोदरही कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर काही आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना एका वर्षाची…

Read More

आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडला स्थलांतरित नूतन ट्रान्सफॉर्मर्सचा लोकार्पण सोहळा

महाराष्ट्र बुलेटिन : खेड शहरातील बंदर नाका (देवणा) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ट्रान्सफॉर्मर्स जगबुडी नदीपात्राजवळ असल्याकारणाने गेली कित्येक वर्षांपासून तेथे पुरजन्य परिस्थिती उद्भवल्यास ते पाण्याखाली जात होते. दरम्यान लोकांची गैरसोय थांबावी या उद्देशाने त्वरित आमदार निधीतून योगेशदादा कदम यांनी १० लक्ष रुपये या कामासाठी उपलब्ध करून दिले आहेत व तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना…

Read More

संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले- मोदींशी स्पर्धा करण्यासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाही आणि जोपर्यंत विरोधकांकडे चेहरा नाही तोपर्यंत कोणतीही संधी नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. तथापि संजय राऊत यांनी म्हटले की २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी एखादा मोठा चेहरा…

Read More

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, जाणून घ्या…

महाराष्ट्र बुलेटिन : नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच चिघळले असून महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांचे सूर काही जुळत नसल्याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. नाना पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये असे वक्तव्य केले की मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असून राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम…

Read More

संजय राऊत यांनी लोकसंख्या कायद्याबाबत मुख्यमंत्री योगी यांचे केले समर्थन, नितीशकुमार यांना दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या…

महाराष्ट्र बुलेटिन : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या लोकसंख्या कायद्यावरील प्रस्तावित कायद्याला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शविला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकसंख्या कायद्याकडे राजकीय चष्म्याद्वारे न पाहण्याला समर्थन देताना संजय राऊत म्हणाले की लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे आणि सर्वांनी मिळून या समस्येचा सामना…

Read More