इतक्या वर्षांनंतर ‘टायटॅनिक’ सापडलं पण, समोर आलं ‘हे’ दाहक वास्तव

टायटॅनिक | After so many years, the 'Titanic' was discovered, but it came to fruition

भव्यता, कलात्मकता, मानवी कल्पनाशक्ती आणि महत्त्वाकांक्षेचं एक उत्तम आणि अजरामर उदाहरण म्हणजे टायटॅनिक जहाज. पहिल्या आणि शेवटच्या अशा एकाच प्रवासात या जहाजावर अशा काही गटना घडल्या की असंख्य लोकांसह असंख्य कहाण्यांसह ते पहिल्याच प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होत कायमचं महाकाय समुद्राच्या पोटात विसावलं.

साधारण गेल्या शतकभरापासून टायटॅनिक हे महाकाय जहाज समुद्रतळाशी विसावलं आहे. पण, आता मात्र त्याचं उरलेलं अस्तित्वंही काळाच्या पडद्याआड जाणार आहे. वीसाव्या शतकातील सर्वात मोठं क्रूझ आणि सर्वात मोठी दुर्घटना पाहणारं जहाज, अशी याची ओळख. १० एप्रिल १९१२ला इंग्लंडमधील साऊथ हँपटन येथून या जहाजाचा प्रवास सुरु झाला होता. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या दिशेने टायटॅनिकचा प्रवास सुरु झाला होता.

ब्रिटन, अमेरिका अशा ठिकाणत्या बऱ्याच प्रतिष्ठीतांसह या जहाजावर एकून २ हजार २२३ प्रवासी होते. या प्रवासादरम्यान, १४ एप्रिलला टायटॅनिक अटलांटिक महासारगात असताना ते एका प्रचंड मोठ्या हिमनगावर धडकलं आणि १५ एप्रिलला या जहाजाला जलसमाधी मिळाली. कधीही न बुडणारं जहाज अशी ओळख प्राप्त असणाऱ्या टायटॅनिकने पहिल्याच प्रवासात श्वास सोडला.

जवळपास एका शतकाचा काळ उलटल्यानंतरही या जहाजाविषयीचं कुतूहल मात्र तसूभरही कमी झालेलं नाही. आजही या जहाजाचा सांगाडा त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तब्बल १४ वर्षांच्या काळानंतर संशोधकांचा चमू पुन्हा एकदा या जहाजाच्या सांगाड्यापाशी पोहोचला आहे.
‘ते सारंकाही अकल्पनीय आहे. सर्वात अदभूत म्हणजे मी टायटॅनिकच्या बाजूने जात होतो. त्याचवेळी पाणबुडीवरचे दिवे सुरु होते. त्यांचा प्रकाश त्यावेळी परावर्तित झाला, असं वाटलं की ते जहाजच माझ्याकड़े पाहून खुणावतंय.. हा अनुभव खरंच सुरेख होता’, असं ते म्हणाले.
अनेक वर्षांनंतर करण्यात आलेल्या या संशोधनातून आता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. शास्त्रज्ञांच्या मते २०३० हे वर्ष उजाडेपर्यंत वाळवीने पोखरल्यामुळे टायटॅनिक पूर्णपणे नष्ट होणार आहे. आणखी दहा ते बारा वर्षांमध्ये लोखंडही पोखरणाऱ्या वाळवीने हे जहाज पूर्णपणे नाहीसं केलेलं असेल. असंख्य इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांसह पहिल्या प्रवासाला निघालेल्या टायटॅनिकच्या अखेरच्या घटकाही आता कायमच्या थांबण्याच्याच मार्गावर आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here