Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांची दिल्लीवारी सफल थोरातांचे मनसेला सोबत घेण्याचे सूचक वक्तव्य.

माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर एक महिन्यांनी पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष भेटला आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नवा प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र घेताच बाळासाहेब थोरातांनी महाआघाडीचे संकेत दिलेले आहे. येत्या निवडणुकीत मनसेसह इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेण्यास प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी एका खाजगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणून दाखविले आहे.

त्यामुळे येणाऱ्या विधासभेला काँग्रेसच्या आघाडी मध्ये मनसे सुद्धा सामील होणार हे आता निश्चितच झालेले आहे. काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट सुद्धा घेतलेली होती. या भेटी दरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलणी झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला याच मनसे पक्षाला सामील करून घेण्यास माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता. परंतु नवनिर्वाचित अध्यक्षांनी मनसेला सोबत घेण्याचे बोलून दाखविल्यामुळे चव्हाण आणि थोरात यांच्यात मनसेला सोबत घेण्यावरून वाद आहे हेच दिसून येते.

महाआघाडी सामील होण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी अजून काहीही वक्तव्य केलेले नाही आहे. परंतु सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या मुलाखतीनंतर मनसे महाआघाडीत सामील होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर मनसे विधानसभेला काँग्रेस सोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर मनसेला मानणारा मराठी मतदार मनसेला स्वीकारेल का? यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a comment

0.0/5