विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे यांच्या सोबत युती नाही – काँग्रेस

काँग्रेस | Assembly-elections-Raj

लोकसभा निवडणुकीतून राज ठाकरे यांनी माघार घेतली होती परंतु भाजपच्या विरोधात त्यांनी प्रचार केला होता. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात त्यांनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादीला फायदा झाला असल्याच चित्र आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसोबत आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केल आहे.

यावेळी बोलताना त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आम्हाला मनसेशी आघाडी करावी, असे म्हटलेले आहे. परंतु सिद्धांतांत अंतर असल्यामुळे काँग्रेस राज ठाकरे यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी कोणतीही युती होणार नाही. तसेच आम्हाला आशा आहे की, या लोकसभा निवडणुकीत आमची कामगिरी चांगली असेल. त्यामुळे आम्ही मनसेसोबत युती करणार नसल्याचं सिंघवी यांनी स्पष्ट केल आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here