मुस्लिम अपंग नागरिकाला दिला अंबादास दानवेंनी आधार – लॉकडाउन मध्ये देखील शिवसैनिकांची समाजकार्यासाठी धाव.

अपंग नागरिकाला दिला दानवेंनी आधार – लॉकडाउन मध्ये देखील शिवसैनिकांची समाजकार्यासाठी धाव.

संपूर्ण देशात कोरोनाच्या हाहाकाराने चिंताजनक वातावरण निर्माण झालेले असताना असंख्य नागरिक जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचेइ अनेक संस्था, दानशूर नागरिक तसेच सरकार मार्फत पुरवठा करण्यात येत आहे. परंतु एखाद्या अपंग व्यक्तीला कोणत्याही योजनेशिवाय मदत करणे हे कौतुकास्पद चित्र औरंगाबाद येथे पाहावयास मिळाले.

शहराचे शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांना काल त्यांच्या कार्यालयासमोर सत्तार कुरैशी नामक अपंग व्यक्ती जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी कुबड्यांचा आधार घेत अतिशय खडतरपणे रस्ता ओलांडताना दिसला. दानवेंनी लगेचच त्या व्यक्तीकडे विचारपूस केली. त्यावेळी कुरैशी यांनी दानवेंना जीवनावश्यक वस्तू आणायला तसेच इतर कामे करण्यासाठी खूप समस्या होत असल्याचे सांगितले. अपंग असल्यामुळे कुबड्यांचा आधार घ्यावा लागत असल्याची बाब सांगितली. दानवेंनी तत्परतेने दाखल घेत २४ तासांमध्ये कुरैशी यांना एक तीन चाकी सायकल देऊ केली.

अपंग नागरिकाला दिला दानवेंनी-Donations given to a disabled citizen

आमदार, लोकप्रतिनिधी यांनी कुठलाही जात पात धर्म न पाहता फक्त माणुसकीच्या नात्याने केलेल्या या मदतीमुळे अनेक लोकप्रतिनिधींसमोर एक नवा आदर्श आमदार अंबादास दानवे यांनी ठेवला आहे. जात, पात न पाहता गरजूंची मदत करा व राजकारणा पेक्षा समाजकारणाला अधिक महत्व द्या, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण आमच्यात रुजली आहे आणि त्यातूनच आम्ही हे कार्य करतो, असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here